अभिनेत्री झायराची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली

दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान अभिनेत्री झायरा सोबत छेडछाड झाल्याचं तिने म्हटलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 10, 2017, 02:13 PM IST
अभिनेत्री झायराची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली title=

मुंबई : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान अभिनेत्री झायरा सोबत छेडछाड झाल्याचं तिने म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन या घटनेचं वास्तव तिने सांगितलं. विमानात मागे बसलेल्या प्रवाशाने छेड काढल्याचं झायराने या व्हिडीओत सांगितलंय. ही संपूर्ण घटना वर्णन करत असतानाच झायराला रडू कोसळलं.

जायरा वसीमसोबत छेडछाड करणाऱ्या त्या आरोपीची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. विस्तारा एयरलाइन्सने जायराची छेड काढणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलीस आणि मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन आणि DGCA यांनी ही माहिती मिळवली आहे. या प्रवासी भारतीयच असल्याचं समोर येत आहे. पोलीस या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई पोलीस या घटनेच्या माहितीसाठी झायराच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. झायरा या घटनेनंतर खूप अस्वस्थ होती. तिने काही वेळ मागितल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका महिला अधिकाऱ्याने तिचा जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. झायरो सोबत असणाऱ्या सर्व प्रवाशांची लिस्ट बनवण्यात आली आहे. तिच्यासोबतच्या सर्व प्रवाशांची देखील चौकशी होणार आहे.