ओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या

ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 05:00 PM IST
ओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या title=

विनोद पाटील, अहमदाबाद : ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत.

सांस्कृतिक नृत्य आणि गाण्यांतून प्रचार

भाजपनं प्रचारासाठी गुजरातचं सांस्कृतिक नृत्य आणि गाण्यांचा आधार घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजकोट पश्चिम या मतदारसंघात अशाच सांस्कृतिक नृत्याच्या आधारे भाजपचा प्रचार सुरू आहे.

प्रचार आता अंतिम टप्प्यात 

गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदानासाठीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात आलं आहे. उद्या म्हणजे सात तारखेला संध्याकाळपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही बाजूनीं प्रचारासाठी आपली सगळी ताकद गुजरातमध्ये उतरवली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कालच गुजरातमध्ये दाखल झाले. पण पावसामुळे त्यांना एकच सभा घेता आली. त्यांच्या आजच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

भाजपचे मोठे मंत्री गुजरातमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज पुन्हा गुजरातमध्ये आहेत. मोदींची सुरतमध्ये सभा होते आहे. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज आणि उद्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत.