संसद भवनात जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम

जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असताना काल जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम संसद भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी अर्थमंत्रालयाचे बडे अधिकारी जातीनं हजर होते.

Updated: Jun 29, 2017, 12:04 PM IST
संसद भवनात जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम title=

नवी दिल्ली : जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असताना काल जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम संसद भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी अर्थमंत्रालयाचे बडे अधिकारी जातीनं हजर होते.

३० जूनला मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह जीएसटीचं लॉन्चिग करण्यात येणार आहे. ऐनवेळी कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी काल मध्यरात्री ही खबरदारी घेण्यात आली आहे.