प्रवीण तोगडीयांचा ठावठिकाणा लागला...पण...

विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांचा अखेर ठावठिकाणा लागला आहे, ते शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 15, 2018, 10:29 PM IST
प्रवीण तोगडीयांचा ठावठिकाणा लागला...पण... title=

अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांचा अखेर ठावठिकाणा लागला आहे, ते शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने, भोवळ येऊन बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. प्रवीण तोगडीया  यांच्यावर उपचार सुरू आहेत, तसेच ते धोक्याबाहेर असल्याचंही सांगण्यात येत आहे.

प्रवीण तोगडीया यांच्यावर उपचार सुरू

अहमदाबादमधील कोटपूर वाटरपार्क नजीक प्रवीण तोगडीया सापडले आहेत. प्रवीण तोगडीया यांना यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये प्रवीण तोगडीया यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रवीण तोगडीया यांना अटक झाल्याची अफवा

आज सायंकाळी प्रवीण तोगडीया यांना अटक झाल्याची अफवा होती. यावरून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादेत निदर्शनं केली होती, तर काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची देखील मोडतोड केली होती. 

तोगडीया यांना अटक ही केवळ अफवा

प्रवीण तोगडीया यांना अटक झाली नाही आणि ही केवळ अफवा आहे, हे पोलिसांनी या आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र आता प्रवीण तोगडिया बेशुद्ध अवस्थेत सापडून आले, त्यांच्या अहमदाबादेत उपचार सुरू आहेत.