चार न्यायाधिशांच्या आरोपांवर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची बैठक

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे आता देशातल्या घडामोडींना वेग आला.

Updated: Jan 13, 2018, 11:46 AM IST
चार न्यायाधिशांच्या आरोपांवर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची बैठक

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे आता देशातल्या घडामोडींना वेग आला.

दरम्यान सुप्रीम कोर्टा बार असोसिएशनने न्यायाधीशांनी केलेल्या आरोपांवर एक मिटींग बोलावली आहे.

प्रेस कॉन्फरन्स घेणार 

सुप्रीम कोर्ट बारने शनिवारी होणाऱ्या मिटींगमध्ये न्यायाधिशांनी केलेल्या आरोपांवर विचार केला जाणार आहे. त्यानंतर बार असोसिएशन प्रेस कॉन्फरन्स करणार आहे. 

'त्यावर भाष्य नाही'

'चार न्यायाधिश मीडियासमोर आले पण कोणता ठोस मुद्दा घेऊन आले नाहीत. सुप्रीम कोर्टात काही गडबड आहे. काय गडबड आहे ? सत्य काय आहे ? चारही न्यायाधिशांनी यावर भाष्य केले नाही', असे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी सांगितले.