सोनिया गांधींचे या गुप्तहेर संघटनेशी संबंध, सुब्रमण्यम स्वामींचा आरोप

स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्यावर काही गंभीर आरोपही केले.

Updated: Oct 11, 2018, 11:51 AM IST
सोनिया गांधींचे या गुप्तहेर संघटनेशी संबंध, सुब्रमण्यम स्वामींचा आरोप title=

नवी दिल्ली: माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या वडिलांचे केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पुतीन यांनी भारताशी असलेली मैत्री सिद्ध करावी. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री यांच्यासंदर्भातील गोपनीय कागदपत्रे जगासमोर आणली पाहिजेत, अशी मागणी स्वामी यांनी केली. 

तसेच स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्यावर काही गंभीर आरोपही केले. सोनिया गांधी दोनवेळा पुतीन यांना भेटण्यासाठी रशियाला गेल्या होत्या. त्यामुळे पुतीन यांनी सोनिया गांधी आणि त्यांच्या वडिलांचे केजीबी या गुप्तहेर संघटनेशी असलेले संबंध उघड करावेत. सध्या पुतीन दोन्ही बाजूंनी खेळत आहेत, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.