देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 7, 2017, 02:01 PM IST
देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी title=

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

गुरूवारी (५ ऑक्टोबर) झालेल्या वर्ल्ड इकॉनमिक फोरमच्या इंडिया इकॉनमिक समिटमध्ये बोलताना देशातील नोकऱ्या कमी होत असतील तर, ते चांगले लक्षण असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमात बोलताना भारतीय एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, 'जर टॉप २०० कंपन्या नव्या नोकऱ्या निर्माण करत नसतील तर, संपूर्ण व्यावसायिक घटकांना सोबत घेऊन जाने कठीण होऊन बसेन. तसेच, आपण कोट्यवधी लोकांना मागे सोडून मोजकेच लोक पुढे जाऊ'

दरम्यान, मित्तल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून बोलताना पीयूष गोयल म्हणाले, 'सुनीलजींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला मी आणखी एक मुद्दा पुढे जोडू इच्छितो. देशातील नोकऱ्या कमी होत असे तर, ते अच्छे संकेतच आहेत. कारण आजचा युवक हा केवळ नोकरी करत नाही. तसेच, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नपेक्षा स्वत: नोकरी देण्याचा विचार करतोय. देशातील बहुसंख्य युवक आज एंटरप्रेनर बनण्याची भावना मनात ठेवतात', असे मत गोयल यांनी व्यक्त केले.

दरम्यान, गोयल यांच्या विधानावर प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 'गोयल यांचे विधान अत्यंत अपमानकारक आहे. त्यांच्या विधानामुळे मला प्रचंड दु:ख झाले.' रोजगाराच्या मुद्द्यावरून भाजप प्रणीत एनडिएवर राहुल गांधी यांनी हल्ला केला आहे. राहुल यांनी म्हटले आहे की, गुजरात दौऱ्यातही मी देशातील तरूणांच्या नोकऱ्यांचे घटते प्रमाण याबाबत चिंता व्यक्त केली होती. गुजरात दौऱ्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यात बोलताना राहुल गांधी म्हणाले, कृषी आणि रोजगार ही दोन क्षेत्रे देशात आजच्या घडीला प्रचंड अडचणीत आली आहेत. या दोन्ही मुद्द्यांवर राहुल गांधी अपयशी ठरले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.