'टीम राहुल'मध्ये महाराष्ट्रातल्या या नेत्यांना संधी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Updated: Jul 17, 2018, 10:30 PM IST
'टीम राहुल'मध्ये महाराष्ट्रातल्या या नेत्यांना संधी  title=

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ही मोठी घोषणा आहे. काँग्रेसच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातल्याही नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये राजीव सातव, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे. मुकुल वासनिक हे कार्यकारणीमध्ये तर राजीव सातव, बाळासाहेब थोरात आणि रजनी पाटील हे कायम निमंत्रितांमध्ये आहेत. राहुल गांधींच्या या नव्या टीमची बैठक २२ जुलैला होणार आहे. राहुल गांधींच्या टीममध्ये एकूण ५१ सदस्य आहेत. यापैकी २३ जण कार्यकारणीमध्ये, १८ जण कायम निमंत्रितांमध्ये आणि १० जणांचा विशेष निमंत्रितांमध्ये समावेश आहे.

सीडब्ल्यूसी सदस्य पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए के अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि मंत्री यांनी ओमेन चंडी यांना संधी देण्यात आली आहे.

तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरमैया, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, नेते, आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, कुमार वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना आणि गैखनगम यांचा समावेश आहे.

सीडब्ल्यूसीमध्ये स्थायी सदस्यांत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम,  ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंग, आर.पी. सिंग, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील  रामचंद्र खूंटिया, अनुग्रह नारायण सिंग, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई आणि ई. चेल्लकुमार यांचा सहभाग आहे.

विशेष आमंत्रित सदस्यांत केएच मुनियप्पा, अरुण यादव , दीपेंद्र हुडा , जितिन प्रसाद, कुलदीप विश्नोई,  इंटकचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी, भारतीय युवक कॉंग्रेसचे आहे अध्यक्ष केशव चंद्र यादव, एनएसयूआयचे अध्यक्ष फिरोझ खान, अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव आणि काँग्रेस सेवा दल प्रमुख संयोजक लालजीभाई देसाई यांना सहभागी करण्यात आलेय.