सत्तेत येईपर्यंत संघातील नेत्यांनी तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी

देशाची सत्ता हातात येईपर्यँत स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 17, 2017, 05:07 PM IST
सत्तेत येईपर्यंत संघातील नेत्यांनी तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी  title=
नवी दिल्ली : देशाची सत्ता हातात येईपर्यँत स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. गुरूवारी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी आपल्या भाषणात संघातील नेत्यांवर जोरदार टीका केली. 
 
 
राहुल गांधींनी संघावर आरोप करताना म्हटले की, सत्तेत आल्यानंतर त्यांनी झेंड्याला वंदन केले आहे. तसंच ते म्हणाले की, आपण निवडणूक जिंकू शकणार नाहीत, हे माहित असल्याने ते आपल्या माणसांची विविध ठिकाणी वर्णी लावत आहेत. आपल्या सगळ्यांना यांच्या विरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल. गेल्या २ वर्षात १०-१५ कोट्याधीशांचे १ लाख ३० कोटी रुपये त्यांनी माफ केले. संपूर्ण देशात शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. 
 
संघाने संपूर्ण देश १५-२० व्यापाऱ्यांच्या हातात दिला असून तेच लोक हा देश चालवतात. 'मेक इन इंडिया' चे उद्देश संपूर्णपणे फसले आहे. संसदेत मंत्र्यांनी सांगितले की, १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. परंतू, २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांनी वचन दिले होते.