'देशात प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण'

देशामध्ये प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण आहे. याचा मी अनुभव घेतला आहे, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

Updated: Sep 26, 2017, 10:37 PM IST
'देशात प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण' title=

राजकोट : देशामध्ये प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण आहे. याचा मी अनुभव घेतला आहे, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी राजकोटमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना संबोधित केलं.

या भाषणामध्ये राहुल गांधींनी नोटबंदी आणि जीएसटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींच्या नोटबंदीला मनमोहन सिंग गुन्हा म्हणाले होते, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच जीएसटी लागू करताना सरकारनं घाई केल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.

त्याआधी जामनगरमध्ये झालेल्या सभेतही राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. गुजरातमधलं सरकार हे दिल्लीतल्या रिमोट कंट्रोलनं चालतं अशी टीका त्यांनी केली.

यावेळी भाषणाची सुरूवात करण्याआधी राहुल गांधी यांनी नागरिकांना त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी ‘केम छो’ असे विचारले. तेव्हा जनतेकडून लगेच प्रतिसाद मिळाला की, ‘गाडो भई छो’. ‘गाडो थई छो’ चा अर्थ गुजरातीमध्ये पागल झालो. वेडे झालो असा होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ‘विकास गाडो थई छो’ असा नारा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमेरिका दौ-यावरून परत आल्यानंतर राहुल गांधी आगामी गुजरात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इथे प्रचारात बिझी आहेत.