'देश का चौकीदार चोर है'; राहुल गांधींची टीका

भाजपने गौरव यात्रेचा पैसा जनतेच्या खिशातून काढला आहे.

Updated: Sep 20, 2018, 10:16 PM IST
'देश का चौकीदार चोर है'; राहुल गांधींची टीका title=

जयपूर: मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. मात्र, सध्या देशात एक नवीनच आवाज ऐकू येत आहे. गली गली मै शोर है, 'हिंदुस्थान का चौकीदार चोर है', अशा घोषणा अनेकजण देत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 

राहुल गांधी गुरुवारी राजस्थानच्या डुंगरपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने गौरव यात्रेचा पैसा जनतेच्या खिशातून काढला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योगांच्या विकासाला चालना देण्याचेही आश्वासन दिले. एके दिवशी तुम्ही तुमच्या फोनच्या मागे 'मेड इन राजस्थान' किंवा 'डुंगरपूर' लिहीलेले पाहाल, असे त्यांनी सांगितले.