राहुल गांधींचा तेजस्वी यादवांसोबत लंच

 राहुल यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत लंच केला. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 17, 2017, 11:23 PM IST
राहुल गांधींचा तेजस्वी यादवांसोबत लंच  title=

पटणा : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरात निवडणुकीच्या शेड्युल्डमध्ये बिझी आहेत. यातून वेळ काढत राहुल यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत लंच केला. तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली.

राहुल यांचे आभार

मला शानदार लंचसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी राहुल यांना धन्यवाद असे तेजस्वी यांनी आपल्या ट्विटवर लिहिले आहे. मी राहुल यांचा आभारी आणि कृतज्ञ राहिन असेही तेजस्वी यांनी सांगितले.

ठिकाण कोणते ? 

हा फोटो कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत तेजस्वी यांनी कोणती माहिती दिली नाही. 

पंतप्रधान गप्पू 

एक दिवस आधीच राहुल गांधी यांचे कौतुक तेजस्वी यांनी केले होते. एकामागोमाग एक ट्विट करत तेजस्वी यांनी पंतप्रधानांना गप्पू म्हणून संबोधले होते. 'पप्पू'ची लोकप्रियता वाढत असताना 'गप्पू' ची लोकप्रियता दिवसेंदिवस खाली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तेव्हाही भाजपाविरोधात युती 

राजद आणि काँग्रेस सोबत येणे हे काही नवे नाही. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस- आरजेडी-जेडीयूने भाजपा विरोधात युती केली होती. त्यावेळीही तेजस्वी आणि राहुल यांची जोडी दिसून आली होती.