लव जिहाद : एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ वायरल

गुरूवारी अगदी विचित्र घटना घडली आहे. लव जिहाद मुद्यावरून एका व्यक्तीला आपला जीव गमावला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 7, 2017, 09:17 PM IST
लव जिहाद : एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ वायरल

जयपूर : गुरूवारी अगदी विचित्र घटना घडली आहे. लव जिहाद मुद्यावरून एका व्यक्तीला आपला जीव गमावला आहे. 

घटना अशी घडली की, गुरूवारी एका मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला वाईटपद्धतीने मारण्यात आलं. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला जीवंतपणे जाळण्यात आलं. या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आलं आहे.
आरोपी शंभूनाथ रायगरने या भयानक कृत्याचे रेकॉर्डिंग केले आणि सोशल मीडियावर ते अपलोड केले आहे. ही घटना राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस अधिक्षक मनोज कुमार यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद भट्ट शेख असे आहे. 

काय म्हणाले पोलीस?

आश्चर्याची बाब म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये रायगर आपलं हे कृत्य लपवताना दिसत आहे. मनोज कुमार यांनी सांगितले की, अर्ध्या अवस्थेत जळालेले शव राजसमंद जिल्ह्यात सापडल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तिथेच एएसपी मनीष त्रिपाठी व डीएसपी राजेंद्र सिंह यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले. जिथे त्यांना विकृत अवस्थेत शव सापडला. लगेच फॉरेंसिक लॅबने टीम व श्वान पथकाला बोलावण्यात आले. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओ पीडित व्यक्ती आरोपी शेखवर फावड्याने हमला करताना दिसत आहे. त्याच्या शरिरावर केरोसिन टाकून त्याला जिवंत जाळण्यात आले. रायगरने चेतावनी दिली की जे लव जिहादमध्ये लिप्त आहेत. त्यांची देखील तिच नियती आहे. हत्येत असलेल्या वस्तू, शेखची बाइक आणि चप्पला घटनास्थळी आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close