राम रहीमला मदत? ३ पोलिसांना अटक

एसआयटीने हरायाणातून ३ पोलीस कर्मचाऱ्यांना अकट केली आहे. बाबा राम रहीम यास पळून जाण्यास मदत केल्याचा या तीनही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 09:19 PM IST
राम रहीमला मदत? ३ पोलिसांना अटक

नवी दिल्ली : एसआयटीने हरायाणातून ३ पोलीस कर्मचाऱ्यांना अकट केली आहे. बाबा राम रहीम यास पळून जाण्यास मदत केल्याचा या तीनही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.

२५ ऑगस्टला पंचकूला येथून पळून जाण्याचा बाबा राम रहिम याचा कट होता. या कटात तीन पोलीस कर्मचारीही सहभागी होते, असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पोलीस कॉन्स्टेबल राजेश, हेड कॉन्स्टेबल अमित आणि हेड कन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे.

तीनीही आरोपींजवळ हत्यार बाळगल्याचा संशय आहे. तीनही आरोपींनी पंचकूला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.