'तीन तलाक'च्या निर्णयावर देशभरात उमटल्या प्रतिक्रिया...

सर्वोच्च न्यायालयानं ट्रीपल तलाक घटनाबाह्य ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयाचं सत्ताधारी भाजपसह देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वागतच केलंय. 

Updated: Aug 22, 2017, 03:15 PM IST
'तीन तलाक'च्या निर्णयावर देशभरात उमटल्या प्रतिक्रिया...    title=

नवी दिल्ली / मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं ट्रीपल तलाक घटनाबाह्य ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयाचं सत्ताधारी भाजपसह देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वागतच केलंय. 

भाजपनं या निर्णयाचं स्वागत करत मुस्लिम समाजाच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलंय.

शिवसेनेही हा निर्णय अत्यंत चांगला असून मुस्लिम बांधवांनी याला विरोध करु नये, असं आवाहन केलंय. काँग्रेसनेही या निर्णयाचं स्वागत केलंय. 

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी आणि भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी निकालाचं स्वागत केलंय

मुंबईमध्ये मुस्लिम महिलांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. त्याचप्रमाणे एकमेकांना पेढे भरवून मुस्लिम महिलांनी आनंद साजरा केला.

मात्र, सुप्रीम कोर्टानं ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवल्यानं औरंगाबमधल्या मुस्लीम महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. मुस्लीम धर्माच्या शरीयतमध्ये ढवळाढवळ कशासाठी? असा सवाल मुस्लीम महिलांनी केलाय. देशात अनेक मुद्दे असून याच विषयात एवढा रस कशाला असा प्रश्नही उपस्थित केलाय.