...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत!

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 04:48 PM IST
...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत! title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले. भाजप-कॉग्रेसमध्ये होणारा संघर्ष, राजकारण सर्वांच्याच परिचयाचा आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर कॉग्रेसने केंद्र सरकार आणि भाजप पार्टीवर टिका केली. 

करावे तसे भरावे

पण राहुल गांधींवर ही वेळ नेमकी का आली ? तर याचे सोपे उत्तर म्हणजे जशाचं तसे. जेसे करावे तसे भरावे, ही म्हण प्रचलित आहे आणि अत्यंत खरी देखील आहे. राहुल गांधींच्या सहाव्या रांगेतील स्थानाबद्दल भाजपने सांगितले की, जेव्हा कॉग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी देखील भाजप नेत्यांसोबत असेच वर्तन केले होते. मात्र यामुळे कॉग्रेस कार्यकर्त्यांनी हंगामा केला. पण प्रोटोकॉलनुसारच राहुल गांधींना सीट देण्यात आली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता जी वी एल नरसिम्हा राव म्हणाले की, १३३ वर्षांचा शानदार इतिहास असणाऱ्या पक्षाला असे वागणे शोभत नाही.

राहुल गांधी स्वतःला सुपर व्ही.व्ही. आय. पी. मानतात

त्याचबरोबर ते म्हणाले की,  जेव्हा कॉग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी राजनाथ सिंग आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबतही असेच वर्तन केले होते. मात्र आम्ही कधी त्याचा इशू केला नाही. आम्ही लोकतंत्र भावनेने काम केले. त्याचबरोबर राव यांनी सांगितले की, कॉग्रेसची सत्ता नसली तरी राहुल गांधी स्वतःला सुपर व्ही.व्ही. आय. पी. मानतात. आमचा पक्ष मुल्यांवर विश्वास ठेवणारा आहे. आम्ही फक्त कायदा, नियम आणि परंपरचे पालन करत नाही तर नेते आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा सन्मानही करतो.