तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद, या तारखेआधी अपडेट करा

बँकेमध्ये जावून तुमचं कार्ड अपडेट करा

Updated: Sep 23, 2018, 03:25 PM IST
तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद, या तारखेआधी अपडेट करा title=

नवी दिल्‍ली: बँकेचे एटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच तुमचं जुनं एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड बंद करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. देशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. एक मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप असणारं कार्ड. पण आता बँक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार आहेत. चिप असणारे कार्ड त्याला रिप्‍लेस करणार आहेत. आरबीआयच्या आदेशानंतर बँकांना ग्राहकांना कार्ड रिप्लेस करुन देणं अनिवार्य असणार आहे. 

कार्ड बदलण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. ग्राहकांचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामुळे आणखी सुरक्षित होणार आहे.

मॅग्नेटिक स्ट्राईप

आरबीआयच्या मते मैग्‍नेटिक स्‍ट्राइप कार्ड आता जुनी झाली आहे. असे कार्ड बनवणे देखील आता कमी झाले आहे. हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित देखील नव्हते. यामुळेच ते बदलण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या जागी आता EMV चिप कार्ड ग्राहकांना दिले जाणार आहेत. 

आरबीआयचे आदेश

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 मध्ये सगळ्या बँकांना आदेश दिले होते की, ग्राहकांना सामान्य मॅग्‍नेटिक स्‍ट्राईप कार्डच्या ऐवजी चिपचे कार्ड दिले जावे. डिसेंबर 2018 पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामुळेच बँक आता फक्त चिप असणारे एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड देणार आहे. ग्राहकांना यासाठी सूचना देखील देण्यात आले आहेत. देशात सध्या 39.4 मिलियन अॅक्टिव क्रेडिट कार्ड आणि 944 मिलियन अॅक्टिव डेबिट कार्ड वापरले जात आहे.