...तर मुकेश अंबानी २० दिवस देश चालवू शकतील

उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्याकडे एवढा पैसा आहे की, २० दिवस देश चालवू शकतील. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या 'ब्लूमबर्ग २०१८ रॉबिनहूड्स' च्या यादीनुसार हे स्पष्ट झालंयं. या यादीतून मुकेश अंबानी यांची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झालीए. 

Updated: Feb 13, 2018, 09:21 PM IST
 ...तर मुकेश अंबानी २० दिवस देश चालवू शकतील

नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्याकडे एवढा पैसा आहे की, २० दिवस देश चालवू शकतील. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या 'ब्लूमबर्ग २०१८ रॉबिनहूड्स' च्या यादीनुसार हे स्पष्ट झालंयं. या यादीतून मुकेश अंबानी यांची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झालीए. 

ब्लूमबर्गने जगभरातील श्रीमंतांची यादी जारी केलीए. त्यानुसार उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीचा अंदाज लावता येऊ शकतो.

भारत २० दिवस चालवू शकतील

 मुकेश अंबानी २० दिवस भारत देश चालवू शकतील, असे अनुमान यानुसार लावता येत आहे. 

चीनचा कारभार चार दिवस 

 जॅक मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून तेदेखील 'चीन'ची अर्थव्यवस्था सावरू शकतील.पण केवळ ४ दिवस देश चालेल एवढी संपत्ती त्यांच्याकडे असल्याचे समोर आलेयं. 

अमेरिकेचा ५ दिवसाचा कारभार 

 अमेरिकेतील धनवान असणारे जेफ बेजॉस  यांच्या संपत्तीचा अंदाज न लावलेलाच बरा. पण त्यांनी जर प्रसंगी अमेरिकेचा गाडा हाकायला घेतला तर केवळ संपत्ती केवळ ५ दिवसच पुरू शकते.