गुरमीतनंतर बलात्कारी 'फलाहारी' बाबाला अटक

एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांनी अलवर आश्रमातील 'फलाहारी बाबा' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका ढोंगी बाबाला अटक केलीय. 

Updated: Sep 23, 2017, 03:47 PM IST
गुरमीतनंतर बलात्कारी 'फलाहारी' बाबाला अटक  title=

अलवर : एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांनी अलवर आश्रमातील 'फलाहारी बाबा' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका ढोंगी बाबाला अटक केलीय. 

मूळची छत्तीसगडची असलेल्या एका तरुणीनं फलाहारी बाबावर बलात्काराचा आरोप केला होता. बाबाच्या अटकेनंतर तरुणीला मधुसूदन आश्रमातील भोंदूबाबाच्या कक्षात नेण्यात आलं. 

यावेळी पोलिसांना चौकशीदरम्यान अनेक महिलांचे कपडे आणि दागिने आढळलेत... तसंच पोलिसांनी या कक्षातून लॅपटॉप आणि काही सीडीही जप्त केल्यात. आश्रमातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलंय.