सलमान खानच्या बहिणीच्या सासऱ्यांचा निवडणुकीत विजय

सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माचे सासरे अनिल शर्मा यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 18, 2017, 04:38 PM IST
सलमान खानच्या बहिणीच्या सासऱ्यांचा निवडणुकीत विजय title=

नवी दिल्ली : सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माचे सासरे अनिल शर्मा यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे.

भाजपकडून मैदानात

अनिल शर्मा यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली. ते भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात होते. अनिल शर्मा आधी काँग्रसमध्ये होते. याच वर्षी ते भाजपमध्ये आले होते.

Image result for anil sharma win zee

काँग्रेसला केला होता रामराम

अनिल सिंह हे वीरभद्र सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री सुखराम हे आहेत. काँग्रेसने त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. त्यांना काँग्रेसमध्ये घुसमट वाटत होती म्हणून त्यांनी काँग्रेस सोडल्याचं म्हटलं होतं.