अन्नाची नासाडी टाळाण्यासाठी येथे सुरू झाले 'फूड एटीम' !

कोलकत्त्यामध्ये सुरू झाले 'फूड एटीम' 

Updated: Aug 24, 2017, 11:41 AM IST
अन्नाची नासाडी टाळाण्यासाठी येथे सुरू झाले 'फूड एटीम' ! title=

कोलकत्ता : वाया जाणारे अन्न गरीबाच्या आणि भूकेलेल्यांच्या मुखी लागावे याकरिता कोलकातामध्ये ३२० लिटरचा फ्रीज उभारण्यात आला आहे. सध्या देशभर हा ' फूड एटीम' या नावने ट्रेंड होत आहे.  

कोणी केली ही सुरूवात ?  
कोलकातातील 'सांझा चुल्हा' या रेस्टॉरंट चेनचे सह मालक, असिफ अहमद यांनी तीन इतर संस्थेच्या मदतीने 'फूड एटीम' ही संकल्पना सुरू केली आहे.  रोटरी, राउंड टेबल आणि जेआईटीओ या संस्थांच्या मदतीने कोलकत्त्यातील पार्क सर्कस  रेस्टॉरंटच्या बाहेर उभारले आहे.  

काय आहे 'फूड एटीम'  ? 
'फूड एटीम' हा एक प्रकारचा पारदर्शक फ्रीज आहे. यामध्ये अन्नपदार्थ साठवणं शक्य आहे. 'आम्ही रेस्टॉरंटमध्ये येणार्‍या खवय्यांना उरलेले अन्न फेकण्याऐवजी पॅक करण्याचे आवाहन करतो.' असे अहमद यांनी सांगितले आहे. 
शहरातील इतर नागरिकही उरलेले चांगले अन्न यामध्ये दान करू शकतात. पाव आणि बिर्याणी हे दोन पदार्थ हमखास उरतात. त्यांचा फ्रेश फूडमध्ये समावेश केला जातो. 

 'वर्षभर भारतात जितके अन्न  वाया जाते तितके इजिप्तला एका वर्षभरासाठी पुरेसे आहे.'  असा खास संदेश या फूड एटीमवर लिहला आहे.