...तर 1 डिसेंबरपासून ब्लॉक होणार ही सुविधा, एसबीआयचा ग्राहकांना इशारा

तुम्हीही नेट बॅंकींग वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Updated: Oct 13, 2018, 05:11 PM IST
 ...तर 1 डिसेंबरपासून ब्लॉक होणार ही सुविधा, एसबीआयचा ग्राहकांना इशारा title=

नवी दिल्ली : जर तुमचं देखील स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये अकाऊंट आहे आणि तुम्हीही नेट बॅंकींग वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही 1 डिसेंबर पर्यंत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला नाही तर एसबीआयकडून इंटरनेट सुविधा बंद केली जाऊ शकते. जे ग्राहक आपले मोबाईल नंबर रजिस्टर करणार नाहीत ते पुढे नेट बॅंकिंगचा वापर करु शकणार असल्याचे एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर लिहलंय.

एटीएम वापरताय ? 

एटीएम ट्रांझाक्शनमध्ये होणारे धोके टाळण्यासाठीही एसबीआयतर्फे नवं पाऊलं उचलण्यात आलंय. एसबीआयच्या नव्या नियमानुसार ग्राहक दिवसाला 20 हजार रुपयेच काढू शकता. नवा निय 31 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

आतपर्यंत तुम्ही एसबीआय एटीएममधून 40 हजारपर्यंतची रक्कम काढू शकत होतात. 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला 40 हजारापर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

एसबीआयच्या सर्व शाखांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

एसबीआयचा मोठा निर्णय 

एसबीआयच्या कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे नाही जमा करु शकणार. म्हणजेच आता फक्त तुम्हीच तुमच्या एसबीआय खात्यात कॅश काऊंटरवर जाऊन पैसे जमा करु शकता. वडील देखील आपल्या मुलाच्या खात्य़ात पैसे नाही जमा करु शकणार.

का घेतला हा निर्णय?

एसबीआयला या नव्या निर्णयाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, नोटबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात बँक खात्यांमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा जमा करण्यात आले. जेव्हा अशा लोकांची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. अनोळखी माणसाने त्यांच्या बँकेत हे पैसे जमा केले होते.

आयकर विभागाने सरकारी बँकांना सूचना दिल्यानंतर हा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसरा कोणताही व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे नाही जमा करु शकणार. बँकचे म्हणणं आहे की, ही व्यवस्था लागू केल्यानंतर दहशतवाद्यांना होणाऱ्या फंडीगवर ही परिणाम होणार आहे.

कसे जमा कराल पैसे

बँकेने हा नवा नियम आणल्यानंतर त्याला पर्याय देखील आणला आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे असतील तर त्याला खातेधारकाचे अनुमती पत्र आणावं लागेल. बँकेच्या काउंटरवर पैसे जमा करताना दिल्या जाणाऱ्या स्लीपवर ज्याचे खाते आहे त्याची सही असणं आवश्यक आहे.

ऑनलाईन पद्धतीने कोणीही कोणाच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. ऑनलाईन पैसे जमा करण्यासाठी हा नवा नियम लागू नसणार आहे.

एसबीआयचं म्हणणं आहे की, जर ग्रीन कार्ड आणि इंस्टा डिपॉजिट कार्ड असेल तर कोणताही व्यक्ती कोणाच्याही खात्यात या कार्डच्या माध्यमातून डिपॅाजिट मशीनमध्ये पैसे जमा करु शकतो.