देशभरातील कॅश समस्या दूर करण्यासाठी एसबीआयची ही मोफत सर्व्हिस

एसबीआयने रिटेल आऊटलेटवर PoS मशीनद्वारे एका दिवसात २ हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. 

Updated: Apr 22, 2018, 06:56 AM IST
देशभरातील कॅश समस्या दूर करण्यासाठी एसबीआयची ही मोफत सर्व्हिस title=

नवी दिल्ली : देशातील अनेक ठिकाणी सध्या अपुऱ्या कॅशची समस्या अनेक ठिकाणी उद्भवतेय. ही समस्या दूर करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एक पाऊल पुढे टाकलयं. एसबीआयने रिटेल आऊटलेटवर PoS मशीनद्वारे एका दिवसात २ हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे.

डेबिट कार्डने काढा कॅश 

आमचे ग्राहक अथवा इतर ग्राहकही आमच्या पॉईंट्स ऑफ सेल्स टर्मिनल्सवर येऊ शकतात आणि आपल्या डेबिट कार्डने कॅश काढू शकतात, असे एसबीआयतर्फे सांगण्यात आलयं. 

पीओएस मशीनने काढा रक्कम 

देशभरात भारतीय स्टेट बॅंकेती एकूण ६.०८ लाख पीओएस मशीन आहे. यामध्ये ४.७८ लाख पीओएस मशीनमधून कॅश मिळण्याची सुविधा आहे. भारतीय रिझर्व बॅंकेच्या गाईडलाईननुसार, सध्या टियर वन आणि टू शहरात प्रति कार्ड १ हजार आणि टियर ३ पासून टियर ६ शहरांमध्ये २ हजार रुपये प्रतिदिन काढले जाऊ शकतात.

डेबिट कार्डहून काढा १ हजार पर्यंत रक्कम 

एसबीआय आणि इतर  बॅंकांचे ग्राहक आपल्या डेबिट कार्डचा उपयोग टियर ३ ते ६ शहरांमध्ये हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास करु शकतात असे एसबीआयचे डीएमडी (चीफ ऑपरेटींग ऑफिसर) नीरज व्यास यांनी सांगितले.  तर टीरय १ आणि टियर २ शहरात प्रतिदिन हजार रुपये काढत असल्याचेही त्यांनी सांगितले.  आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कॅशची समस्या उद्भवली आहे.