मालवहातूकदारांच्या संपात स्कूल बसचालकांचीही उडी

 मालवाहतूक पूर्णपणे ठप्प 

Updated: Jul 20, 2018, 11:08 AM IST
मालवहातूकदारांच्या संपात स्कूल बसचालकांचीही उडी title=

मुंबई : आज मालवहातूकदारांच्या संपात स्कूल बसचालकांनीही उडी घेतली आहे. मुंबईत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर संमिश्र प्रतिसाद दिसतो आहे. मालवाहतूक पूर्णपणे ठप्प असून ज्या शाळांच्या खाजगी स्कूल बस आहेत त्या मात्र संपात सहभागी नसल्याचे चित्र पहायला मिळतं आहे. पुण्यात स्कूलबस पूर्णपणे संपात उतरल्यामुळे बंदमध्ये त्यांचा परिणाम जाणवतो आहे. प्रवासी वाहतूकीवर मात्र विशेष परिणाम नाही तर मालवाहतूकदार मात्र १०० टक्के या संपात सहभागी झालेले आहेत.

काय आहेत मागण्या

1. पेट्रोल, डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणावे आणि इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करण्यात यावे अशी मालवाहतूकदारांची मागणी आहे. 

2. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर शाळेच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी. 

3. विम्याच्या हप्त्यात कपात करावी. 

4. प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करुन त्याऐवजी शालेय वाहतूक सुरक्षा समितीकडून वाहनांची तपासणी करण्यात यावी. 

5. शाळेजवळ वाहनं उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळावी. 

6. रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे.