शाळेच्या सुरक्षा रक्षकानेच केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार...

दिल्लीत सात वर्षाच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 01:17 PM IST
शाळेच्या सुरक्षा रक्षकानेच केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार...

बंगळूर : दिल्लीत सात वर्षाच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. मुलीने घरी गेल्यानंतर गुप्तभागात होणाऱ्या त्रासाबद्दल पालकांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीनंतर मुलीवर बलात्कार झाला असल्याचे सिद्ध झाले. 

पीडित मुलीला उलट्या देखील होत होत्या. त्यामुळे तिला एमएसआर रमैया रुग्णालयात नेण्यात आले आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर झालेल्या प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. घडलेल्या प्रकारची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी शाळेच्या पाच सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, पाचपैकी एका सुरक्षा रक्षकाने गुन्हाची कबुली दिली आहे. पीडित मुलगी पूर्णपणे बारी होण्याची वाट पोलीस बघत आहेत. त्यानंतर ती गुन्हेगाराला नीट ओळखू शकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसहीत इतर सुरक्षा यंत्रणेचे पालन केले आहे. तरी देखील अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. 

शाळेत सातत्याने घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे मुलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न उभा राहिला आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close