जम्मू-पठाणकोट मार्गावर दहशतवादी हल्ला

  जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 08:54 AM IST
जम्मू-पठाणकोट मार्गावर दहशतवादी हल्ला  title=

जम्मू :  जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

शनिवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झालेत तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय.. लष्कराचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरुच आहे.. मारलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. लष्कराचे जेसीओ मदनलाल आणि जवान मोहम्मद अशरफ शरीफ हे शहीद झाले.

याशिवाय दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारलीय. या घटनेनंतर जम्मूमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय...