पाहा, तब्बल १ कोटी ६० लाख प्रकारच्या रंगसंगती

तब्बल 1 कोटी 60 लाख प्रकारच्या रंगसंगतीचं वैविध्य हे या अद्भूत अशा प्रकाशयोजनेचं वैशिष्ट्य आहे. 

Updated: Oct 12, 2017, 01:55 PM IST

नवी दिल्ली : वास्तुकलेचा अप्रतिम नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनाच्या नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकला आता नवी झळाळी मिळाली आहे. 

या दोन दिमाखदार वास्तूंसाठी आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

तब्बल 1 कोटी 60 लाख प्रकारच्या रंगसंगतीचं वैविध्य हे या अद्भूत अशा प्रकाशयोजनेचं वैशिष्ट्य आहे.

नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकच्या मिळून एकंदर सुमारे साडे 21 हजार चौरस मीटर इतक्या विस्तृत क्षेत्रावर, रंगसंगतीचा हा आकर्षक नजराणा पाहायला मिळणार आहे. 

संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत, दरदिवशी या प्रकाशयोजनेचा आनंद अऩुभवता येणार आहे.