शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत

शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 26, 2018, 03:42 PM IST
शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत title=

मुंबई : शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये. 

गोव्यात स्वबळावर

२०१९ मधील निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता गोव्यातही शिवसेना स्वबळावर लढणार आहे. गोवा लोकसभा दोन्ही जागा शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजप विरोधात बंडखोरीचे शिवसेनेचे पहिलं पाऊल टाकलं आहे. 

गोवा सुरक्षा मंचचं काय?

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचशी युती केली होती. या युतीत त्यांनी ३ जागा लढवल्या होत्या. साळेगाव, मुरगाव, कोंकिळी या त्या तीन जागा होत्या. 

कोण देणार पाठींबा?

मात्र आता शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यानंतर गोवा सुरक्षा मंचशी झालेल्या युतीबाबत पुढे काय करणार? हा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, गोवा सुरक्षा मंचचा आम्हाला पाठींबा असेल. ते विधानसभा आमच्या पाठिंब्यावर लढतील, असे ते म्हणाले.