सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करेल- शिवसेना

 '2014 च्या जाहीरनाम्यात सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कोणती आश्वासने दिली होती व चार वर्षांत त्यांची किती पूर्तता झाली का ? '

Updated: Oct 1, 2018, 08:03 AM IST
सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करेल- शिवसेना  title=

मुंबई : पंतप्रधान मोदींनी देशात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत आश्वासनांचे बंगले बांधले पण प्रत्यक्षात यातलं काहीच न झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलायं. सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करेल असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र सामनातून देण्यात आलाय. निवडणुकीत राजकिय पक्षांकडुन होणाऱ्या जुमलेबाजीस रोख लावणार असल्याचे राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर हे केवळ आपल्या राज्यापुरतेच आहे की देशभरातही याची अंमलबजावणी होणार का ? असा सवाल शिवसेनेतर्फे विचारण्यात आलायं.

मुख्यमंत्र्यांचे जुमले 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आश्वासनांची खैरात करत कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी पाच-सहा हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्यातला एक रुपयाही मिळाला नाही. एवढंच नव्हे तर जळगाव-सांगली महानगरपालिका निवडणुकांतही अशीच आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही सेनेनं म्हटलंय.

कठोर पावले उचला

 2014 च्या जाहीरनाम्यात सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कोणती आश्वासने दिली होती व चार वर्षांत त्यांची किती पूर्तता झाली का ? याची माहिती निवडणूक आयोगाने घ्यावी आणि त्यानुसार कठोर पावले उचलावी असे शिवसेनेतर्फे सांगण्यात येतयं.