कर्नाटकमध्ये कुत्रं मेलं तरी मोदींना जबाबदार धरणार का?:प्रमोद मुतालिक

Updated: Jun 18, 2018, 09:40 AM IST

बंगळुरू: कर्नाटकमध्ये कुत्रं मेलं तरी मोदी जबाबदार आहेत का, असा सवाल विचारलाय राष्ट्रीय हिंदू सेनेच्या प्रमोद मुतालीक यांनी विचारला आहे. काँग्रेसच्या काळात कर्नाटकात आणि महाराष्ट्रात दोन खून झाले. पण काँग्रेसच्या अपयशाबाबत कोणीच विचारत नाहीये. पण लंकेशच्या मृत्यूबाबत मोदी गप्प का असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे कर्नाटकात कुत्रं मेलं तरी मोदी जबाबदार का असा अजब प्रश्न त्यांनी विचारला.