भडकलेल्या स्मृती इराणींचं सोनिया गांधींना पत्र

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एका पत्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. 

Updated: Aug 10, 2017, 04:44 PM IST
भडकलेल्या स्मृती इराणींचं सोनिया गांधींना पत्र title=

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एका पत्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. भारत छोडो आंदोलनाच्या ७५व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना सलाम करत असतानाच सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलं. देशामध्ये सध्या सुडाचं आणि विभाजनाचं राजकारण सुरू असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.

देशातली लोकशाही सध्या धोक्यात आहे. स्वातंत्र्याचं बलिदान आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि हे वाचवण्यासाठी काम करावं लागेल, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. सोनिया गांधींच्या या भाषणावर स्मृती इराणींनी टीका केली आहे. भारत छोडो आंदोलनासारख्या ऐतिहासिक घटेनाबाबत बोलण्याऐवजी सोनिया गांधी २०१४मध्ये झालेल्या पराभवाचं दु:ख बोलत असल्यासारखं वाटत होतं, अशी टीका स्मृती इराणींनी केली.

कौटुंबिक संबंध हे सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत हे सोनिया गांधींनी सिद्ध केल्याचा आरोपही स्मृती इराणींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची गोष्ट करत आहेत पण सोनिया गांधी फक्त कुटुंबाचीच गोष्ट करतात, असं इराणी म्हणाल्या. 

पाहा काय म्हणाल्या स्मृती इराणी