व्हिडिओ : कर्नाटकात सोनिया-मायावती यांचं एकमेकांवरचं प्रेम उफाळलं

दोघांनी एकमेकांची अगदी प्रेमानं विचारपूस केली... काही काळ त्यांनी एकमेकांचे हातातले हात सोडले नाहीत...

Updated: May 23, 2018, 05:02 PM IST
व्हिडिओ : कर्नाटकात सोनिया-मायावती यांचं एकमेकांवरचं प्रेम उफाळलं title=

गळुरू : आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रपदी जेडीएसच्या एच डी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री तर काँग्रेसच्या जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथसोहळ्यात भाजप-विरोधकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बुधवारी, जेडीएस नेते एच डी कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बीएसपी प्रमुख मायावती, समजावादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी मंचावर दाखल झाले होते. 

स्टेजवर पोहचताच अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकमेकांना नमस्कार केला... त्यानंतर जनतेला हात दाखवून त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर स्टेजवर दाखल झालेल्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनीही मायावतींची भेट घेतली... सोनिया गांधी आणि मायावती यांनी एकमेकांचे हातात हात घेत आणि एकमेकींची गळाभेट घेत एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं... दोघांनी एकमेकांची अगदी प्रेमानं विचारपूस केली... काही काळ त्यांनी एकमेकांचे हातातले हात सोडले नाहीत... कर्नाटकच्या सत्तास्थापनेच्या निमित्तानं हे दुर्मिळ असं चित्र पाहायला मिळालं आणि कॅमेऱ्यांनीही ते टिपलं... 

शपथविधीपूर्वी अखिलेश यादव आणि मायावती यांच्यातही जवळपास 45 मिनिटांपर्यंत बातचीत सुरू होती. मायावती यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचीही भेट घेतली... मंचावरही अखिलेश यादव यांच्या बाजुच्याच खुर्चीवर मायावती बसलेल्या दिसल्या... त्यांच्या मागच्या खुर्चीवर शरद पवार विराजमान झालेले दिसले. 

दरम्यान यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, आंध्रपदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यातही चर्चा झालेली पाहायला मिळाली.