मध्य प्रदेश: प्रती महिना सरासरी २०० पती खातात बायकोकडून मार

बायकोच्या मारहाणीला कंटाळून पती महोदय आता पोलिसांतही तक्रार करू लागले आहेत. 

Updated: May 14, 2018, 02:38 PM IST
मध्य प्रदेश: प्रती महिना सरासरी २०० पती खातात बायकोकडून मार title=

भोपाळ : आपला भारत पुरूषप्रधान असल्याने अनेक महिलांना नेहमीच पतीकडून होणाऱ्या छळाला सामोरे जावे लागते. बहुतांश पती आपल्या पत्नीला मारहाण करतात, असा आजवरचा नेहमीचाच सूर. पण, मध्यप्रदेशमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून पुढे आले आहे की, केवळ केवळ पुरूषच पत्नीला मारतात असे नाही. तर, स्त्रीयाही आपल्या पतींना मारहाण करतात. महिलांकडून मार खाणाऱ्या पुरूषांचाही आकडा कमी नाही. इतकेच नव्हे तर, बायकोच्या मारहाणीला कंटाळून पती महोदय आता पोलिसांतही तक्रार करू लागले आहेत. 

मध्य प्रदेशात गुन्हेगारांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासाठी काही वर्षांपूर्वी 'डायल १००' ही सेवा सुरू करण्याता आली. या सेवेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात प्रतिमहीना सरासरी २०० पतींना त्यांच्या पत्नी मारहाण करतात.

पतीला मारण्यात इंदोर क्रमांक एकवर

एकूण आकडेवारी पाहता मध्य प्रदेशात इंदोर पतींना मारण्यात आघाडीवर आहे. जानेवारी ते एप्रिल २०१८ पर्यंतच्या चार महिन्यात ७२ पतींनी पत्नी मारहाण करत असल्याची तक्रार नोंदवली आहे. 

भोपाळ क्रमांक दोनवर

पत्नीकडून मार खात असलेल्या पतींच्या आकडेवारीत भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भोपाळमद्ये जानेवारी ते एप्रिल २०१८ या काळात ५२ पतींनी मार खाल्ला. तसेच, पोलिसांत तक्रारी दिल्या. 

दरम्यान, मध्य प्रदेशातील ताजी आकडेवारी पाहात ८०२ पतींनी पत्नीने मारहाण केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.