हिंसक कावडियांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राजधानीत रस्त्यावर खुलेआम हिंसा घडवून आणण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2018, 08:19 PM IST
हिंसक कावडियांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : राजधानीत रस्त्यावर खुलेआम हिंसा घडवून आणण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. राजधानी दिल्लीसह अनेक शहरात कावडियांनी हिंसा केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने हिंसा पसरवणार्‍या कावडियांवर कडक कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अनेक ठिकाणी गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे.

हिंसक जमावाने खासगी संपत्तीचे नुकसानीविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायाल्याने हे आदेश दिले. कावडियांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली त्यावेळी पोलीस काय करत होते? असा प्रश्न अॅटर्नी जनरल यांनी उपस्थित केलाय. 

तसेच कावडियांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला होता. सध्या साक्षर लोक हिंसा करत आहे, कधी मुंबईत मराठा आंदोलनासाठी, तर कधी एससी, एसटी कायद्यासाठी निदर्शने करताना हिंसा केली गेली. एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी एका अभिनेत्रीला धमकवण्यात आले, असेही यावेळी नमूद केले. यावर न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांना उपाय विचारला. त्यावर अॅटर्नी जनरल म्हणाले, अशावेळी पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close