अवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात

दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...

Updated: Nov 5, 2018, 11:21 PM IST
अवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात  title=

मुंबई : दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा... ही मर्यादा ओलांडून दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके फोडलेत तर पोलीस तुमच्यावर थेट कारवाई करतील. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास अनुमती आहे. वेळेच्या मर्यादेबाहेर फटाके फोडलेत तर पोलीस थेट तुमच्या घरी पोहोचलेच म्हणून समजा.

नियम मोडणाऱ्यास आठ दिवसांच्या कारावासाची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे दिवाळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका. दरम्यान आगीच्या घटना आणि घातपाताचा धोका लक्षात घेता आकाशदिवे सोडण्यासही मनाई करण्यात आलीय. असे आकाश दिवे विकताना, बाळगताना अथवा उडवताना कोणी दिसले तर त्याच्यावरही कारवाई होणार आहे.