ताजमहल बघण्यासाठी २०० रुपयांच तिकिटं

एप्रिल महिन्यापासून  ताजमहल बघण्यासाठी गेलात तर ३ तासाच्या आता ताजमहल बघून तुम्हाला बाहेर यावे लागणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2018, 10:33 PM IST
ताजमहल बघण्यासाठी २०० रुपयांच तिकिटं title=

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यापासून  ताजमहल बघण्यासाठी गेलात तर ३ तासाच्या आता ताजमहल बघून तुम्हाला बाहेर यावे लागणार आहे.

पर्यटकांच्या तिकिटातही किरकोळ वाढ करण्यात आली आहे. 

ताजमहल पाहण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या लाखो पर्यटकांवर कोणते निर्बंध नाहीत.

पण येणाऱ्या काळात ताजमहल भारताचा गौरव बनून राहण्यासाठी काही कडक पाऊले उचलली जाणार आहेत.

१० रुपयांनी वाढणार 

नीरीच्या रिपोर्टमधून आलेल्या शिफारसींनुसार, पर्यावरण आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडक पाऊले उचलली जात आहेत.

'ताजमहल' परिसरात प्रवेश करण्यासाठी ४० रुपयांचे तिकिट वाढवून ५० रुपये होणार आहे. यासाठी ई-तिकिटही उपलब्ध होणार आहे.

तिकिटावर बारकोड 

तिकिटीवर बारकोड असणार आहे. यामुळे येणारे पर्यटक ३ तासांपेक्षा जास्तवेळ बसू शकणार नाहीत. ताजमहल बघायला येणारे तिकिट घेतात आणि ८-१० तास बसतात.  

१५ वर्षा पर्यंतची मुलं आणि विद्यार्थ्यांना ताजमहल प्रवेशासाठी कोणते तिकिट नसणार आहे.

२०० रुपयांच तिकिट 

मुख्य मकबाऱ्यात प्रवेशासाठी ५० रुपयांचे तिकिट चालणार नाही. तिथे प्रवेश करायचा असल्यास २०० रुपये तिकिट लागेल.

केवळ पैसे कमावण हा सरकारचा उद्देश नसून वास्तूची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.

गर्दी नियंत्रणाचं आव्हान 

ताजमहल पाहण्यासाठी सर्वसाधारण दिवशी ३० ते ४० हजार पर्यटक येतात. खास क्षणांच्यादिवशी हा आकडा १ लाखांपर्यंत जातो. एवढ्या गर्दीला नियंत्रणात आणणं सोप्पी गोष्ट नसते.