चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव

भारतानेही सावध राहण्यासाठी सैन्य वाढवल्याचे अधिका-यांनी सांगितलंय. 

Updated: Aug 12, 2017, 04:36 PM IST
चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव title=

नवी दिल्ली : डोकलाममधून मागे न हटण्याच्या चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारतानेही सिक्कीम, अरुणाचल प्रदेशांतील सीमेवर सैन्य वाढवलंय.

चीनची खुमखुमी कायम असून, सतत युद्धाची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहण्यासाठी सैन्य वाढवल्याचे अधिका-यांनी सांगितलंय. 

दुसरीकडे कोणत्याही संकटाला किंवा अडचणींचा सामना करायला भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केलं. 

तिबटेच्या काही भागात चीनने आपले सैन्य आणायला सुरुवात केली असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधता जेटली यांनी हे विधान केलं. 

भारतीय लष्कराकडे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती शस्त्रसामग्री आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं.