सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

 जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. यात एक जवान शहीद झालाय तर दोन जवान जखमी झालेत.

Updated: Jun 25, 2017, 03:17 PM IST
 सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद title=

जम्मू :  जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. यात एक जवान शहीद झालाय तर दोन जवान जखमी झालेत.

 श्रीनगरमधील पंथा पोलीस स्टेशनजवळ हा हल्ला झालाय. लष्कर-ए-तोयबानं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलीये. पंथा चौकात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करुन हे दहशतवादी दिल्ली पब्लीक स्कूलच्या दिशेनं पळाले.. त्यामुळे या भागात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. 
 
 स्थानिकांनीही या भागात दशतवाद्यांना पाहिल्याची माहिती दिल्यानं या लष्करानं या भागात कोंबिंग ऑपरेशन सुरु केरण्यात आलं.. दरम्यान या भागात सध्या दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे.. 
 
 तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पहाटे 6:30च्या सुमारास पाकिस्ताननं गोळीबार सुरु केला.. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्यूत्तर दिलंय..