मुलीने आई आणि बॉयफ्रेंण्डसोबत मिळून बापाला केलं ठार

 या घटनेने नाराज होऊन गेले ४ महिने ती वडीलांना जीवे मारण्याचा प्लान बनवत होती.

Updated: Jul 22, 2018, 07:58 PM IST
मुलीने आई आणि बॉयफ्रेंण्डसोबत मिळून बापाला केलं ठार  title=

लुधियाना : अजीत नगरातील एका घरामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी, मुलगी आणि मुलीच्या २१ वर्षाच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आलंय. कुलदीप कुमार यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरात आढळला. गीता कुमार (४१), सुधीक्षा (२०) आणि सुधीक्षाचा बॉयफ्रेंड तरुण तेजपाल (२१) अशी आरोपींची नावे आहेत. सुधीक्षाला याप्रकरणात मुख्य आरोपी मानलं जातंय.  

बॉयफ्रेंड तरुणशी बोलताना वडीलांनी सुधीक्षाचा फोन तोडला होता. या घटनेने नाराज होऊन गेले ४ महिने ती वडीलांना जीवे मारण्याचा प्लान बनवत होती. प्रियकराला भेटण्यास विरोध करणाऱ्या वडीलांचा जीवनचं तिने संपवलं. वडील माझ्यासोबत छेडछाड करतात असे सांगून तिने आपल्या आईलाही या हत्येत सहभागी करून घेतलं.

पहिल्यांदा प्लान फसला 

१८ जुलैला तिघांनी मिळून केलेला प्लान यशस्वी झाला नाही. त्यानंतर हत्येसाठी २.५ लाख रुपयांची खंडणी देण्यात आली. सागर नावाचा तरुण आणि त्याच्या ३ मित्रांना त्यांची सुपारी देण्यात आली. शुक्रवारी कुलदीप कुमारची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलीस कमिशनर सुखचैन सिंह यांनी सांगितले. 

हत्येनंतर सुपारी करणाऱ्यांनी घरातून दोन फोन आणि मोटारसायकलही नेली. सकाळ झाल्यावर गीता आणि सुधीक्षा यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. सुरूवातीला पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासादरम्यान सत्यता समोर आली.