मोदींनी पुन्हा तोडला प्रोटोकॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा प्रोटोकॉल तोडला. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. टोकियोवरून थेट अहमदाबादला पोहोचलेल्या आबेंचे स्वागत करायला प्रोटोकॉल तोडून मोदी स्वत: विमानतळावर हजर राहिले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 13, 2017, 10:02 PM IST
मोदींनी पुन्हा तोडला प्रोटोकॉल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा प्रोटोकॉल तोडला. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. टोकियोवरून थेट अहमदाबादला पोहोचलेल्या आबेंचे स्वागत करायला प्रोटोकॉल तोडून मोदी स्वत: विमानतळावर हजर राहिले.

अहमदाबाद विमानतळावर शिंजो आबे यांचे आगमन झाले. यावेळी विमानाच्या शिडीला काहीसा तांत्रीक प्रॉब्लेम झाला. पण, काही वेळातच तो दूर झाला. मग शिंजो आबे आपल्या पत्नीसह विमानतळावर उतरले. या वेळी प्रोटोकॉल तोडत मोदींनी आबे यांच्याशी हात मिळवला आणि त्यांची गळाभेट घेतली.

दरम्यान, १५ ऑगस्टला लाल किल्यावरून भाषण देण्यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉल तोडत लहान मुलांशी हस्तांदोलन केले होते.