भाजपच्या या मंत्र्याने सोडला सर्वात आधी सरकारी बंगला

या माजी मुख्यमंत्र्यांनी अजूनही नाही सोडले सरकारी बंगले

Updated: May 20, 2018, 06:45 PM IST
भाजपच्या या मंत्र्याने सोडला सर्वात आधी सरकारी बंगला title=

लखनऊ : सुप्रीम कोर्टाने माजी मुख्‍यमंत्र्यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश दिले आहेत. याचं सर्वात आधी पालन केलं आहे ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी. ते लखनऊच्या कालीदास मार्गावरील सरकारी बंगला खाली करणार आहेत. मुख्यमंत्री असतांना त्यांना हे घर देण्यात आलं होतं. सरकारी बंगला खाली करुन ते गोमती नगर येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत.

गृह मंत्री राजनाथ सिंह 2000 ते 2002 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या दरम्यान त्यांना हे घर देण्यात आलं होतं. 2014 मध्ये लखनऊमधून खासदार झाल्यानंतर आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी लखनऊ दौऱ्यात याच बगल्याचा राहण्यासाठी वापर केला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आणि उत्‍तर प्रदेश सरकारने देखील माजी मुख्यमंत्र्यांनी बंगले खाली करण्यासाठी सांगितले आहेत. 15 दिवसात त्यांना बंगले खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

या नेत्यांकडे ही सरकारी बंगले

1. नारायण दत्‍त तिवारी

एनडी तिवारी पहिल्यांदा 1976 ते 1977 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1984, 1985 आणि 1988 ते 1989 ते यूपीचे मुख्‍यमंत्री होते. 

एनडी तिवारी यांच्याकडे 2 सरकारी बंगले आहेत. माजी मुख्‍यमंत्री एनडी तिवारी यांच्याकडे लखनऊमध्ये आणि उत्तराखंडमध्ये देखील बंगला आहे. एनडी तिवारी 2002 ते 2007 पर्यंत उत्‍तराखंडचे देखील मुख्‍यमंत्री होते. एनडी तिवारींनी त्यांच्या बंगल्यामध्ये अनेक बदल केले आहेत. बंगल्यात त्यांनी एक बाग देखील फुलवली आहे आणि एक मंदिर देखील बांधलं आहे.

2. मुलायम सिंह यादव

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे पिता आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा बंगला देखील अखिलेश यांच्या बंगल्याच्या बाजुलाच आहे. लखनऊमध्ये 5बीडी मुलायम यादव यांचा सरकारी पत्ता आहे. मुलायम यांनी त्यांच्या बंगल्याला तोडून मोठा बंगला बनवला आहे. ज्यामध्ये त्यांची दूसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक आणि सून अपर्णा यादव देखील राहतात. मुलायम सिंह यादव पहिल्यांदा 1989 से 1991 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 पर्यंत ते मुख्यमंत्री होते.

3. मायावती

यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचा सरकारी बंगला तोडून मोठा महल बांधला आहे. अनेक एकरवर बनलेल्या या बंगल्यात मायवती राहतात. अनेक सरकारी सुविधांचा त्या लाभ घेतात. मायावती 1995, 1997, 2002-03 आणि 2007 ते 2012 पर्यंत मुख्यमंत्री होत्या.

4. कल्‍याण सिंह

यूपीचे माजी मुख्यंत्री कल्याण सिंह सध्या राजस्थानचे गव्हर्नर आहेत. पण लखनऊच्या मॉल एवेन्यूमध्ये त्यांचं सरकारी घर आहे. कल्याण सिंह लखनऊला याच घरात थांबतात. कल्‍याण सिंह 1991 ते1992 आणि 1997 ते 1999 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. 

5. अखिलेश यादव

यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री असतांना विक्रमादित्य मार्गावरील 4 नंबरचा बंगला अलॉट केला होता. मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी बंगला तोडून तेथे मोठा बंगला  बांधला. ते आपल्या कुटुंबासह याच बंगल्यात राहतात. 2012 ते 2017 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते.