....म्हणून ८३ वर्षीय वृद्धाने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी केले दुसरे लग्न!

राजस्थानमध्ये एका ८३ वर्षाच्या व्यक्तीने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी लग्न केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 19, 2018, 03:06 PM IST
....म्हणून ८३ वर्षीय वृद्धाने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी केले दुसरे लग्न! title=

करोली : राजस्थानमध्ये एका ८३ वर्षाच्या व्यक्तीने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी लग्न केले. आपल्या पहिल्या पत्नीची संमती घेऊन दुसरे लग्न केले. हे अनोखे लग्न राजस्थानमधील कुडगाव भागातील सैमरदा गावात झाले. येथे ८३ वर्षीय सुखराम बैरवा यांनी हिंदू पद्धतीने सर्व विधींसह ३० वर्षीय रेशमीसोबत विवाह केला. 

ही आहे लग्नाची कथा

सुखरामच्या लग्नाची वरातही अगदी वाजतगाजत निघाली. या लग्नाला गावातील मंडळी आणि नातेवाईकही उपस्थित होते. गावातील महिलांनी उत्साहाने गाणी गावून आनंद साजरा केला. ८३ वर्षीय नवरदेवही या लग्नाने सुखावला. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

या लग्नात ८३ वर्षीय मुली, जावई आणि नातवंडही सहभागी झाले. या लग्नात फक्त एकाच नाही तर तब्बल १२ गावांना जेवणाचे आमंत्रण होते. त्यानंतर नवरी मुलीची पाठवणी झाली. त्यानंतर अगदी विधीवत दुसऱ्या पत्नचा गृहप्रेवश झाला. यावेळी पहिल्या पत्नीने अगदी हसत नव्या नवरीचे स्वागत केले.

सुखराम बैरवा यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. मुलींची लग्न झाली आहेत. तर मुलगा कान्हू याचे वयाच्या ३० वर्षी आकस्मित मृत्यू झाला. सुखराम यांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूनंतर वंशवृद्धीचा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

पहिल्या पत्नीने सांगितले...

वृद्ध सुखराम आणि पहिली पत्नी बत्तो बैरवा यांनी सांगितले की, आमच्याकडे खूप संपत्ती, मालमत्ता आहे. हे सांभाळण्यासाठी कोणी वारस मात्र नाही. त्यामुळे पहिल्या पत्नीनेही दुसऱ्या लग्नासाठी संमती दिली.

अनोख्या लग्नाची चर्चा

संपूर्ण गावात या अनोख्या लग्नाची चर्चा आहे. दूरवरून लोक फक्त नवरा-नवरीला भेटायला येत आहेत.