तळ्यातून निघतोय विषारी फेस, वाहतुकही खोळंबली

बंगळुरूच्या वार्थुर तळ्यातून विषारी फेस बाहेर पडतोय, याचं प्रमाण एवढंही का हा फेस रस्त्यावर येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2017, 11:12 AM IST

बंगळुरू :  बंगळुरूच्या वार्थुर तळ्यातून विषारी फेस बाहेर पडतोय, याचं प्रमाण एवढंही का हा फेस रस्त्यावर येत आहे. आज सकाळपासून या विषारी फेसमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीचाही वेग मंदावला आहे.

या फेसासारख्या पुंजक्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का याचा देखील अभ्यास होणे गरजेचं असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

या तळ्यातलं पाणी नेमकं कुठून येतं किंवा यात कोणतं केमिकल्स सोडलं जातंय, याचा अभ्यास होणे गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे.