गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम

रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2017, 08:26 PM IST
गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम title=

नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.

नव्या नियमांतर्गत ऑनलाइन बुकिंग करत असल्यास वेटिंग तिकीट मिळणार नाही. त्यासोबतच शताब्दी, राजधानीसारख्या दुसऱ्या गाड्यांचे कोच वाढवण्यात येणार आहे. 

- तत्काळ तिकिट आरक्षण रद्द केल्यानंतर आता ५० टक्के रक्काम मिळेल. तसेच प्रादेशिक भाषांमध्येही तिकिट तुमच्या हातात मिळेल.

- १ जुलैपासून सुविधा ट्रेन धावणार आहे. या रेल्वेच्या प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळणार नाही. या ट्रेनमध्ये सर्वांना कन्फर्म तिकीट मिळेल. तिकीट रद्द केल्यास फक्त अर्धे पैसे परत मिळेल.

- १ जुलैपासून तुम्ही एसी कोचचे तात्काळ तिकिट बुक करणार असाल तर सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान तिकिट बुकिंग करावे लागेल. तर स्लीपर कोचसाठी तात्काळ तिकिट बुकिंग करण्याची वेळे सकाळी ११ ते   दुपारी १२ वाजेपर्यंत असेल.

- एसी फर्स्ट आणि सेकंडचे तिकीट रद्द केल्यानंतर १०० रुपये अतिरिक्त कापले जातील. 

- एसी थर्ड साठी ही रक्कम ९०  रुपये आणि स्लिपर कोचचे तिकीट रद्द केल्यास ६० रुपये कापले जातील.

- राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससाठी १ जुलैपासून पेपरलेस तिकीट मिळेल. या ट्रेनमध्ये मोबाइल तिकीट व्हॅलिड असेल.

-रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी वेकअप कॉल डेस्टिनेशन सारख्या सुविधा दिल्या उलब्ध करुन देण्यात येणार आहे.

- रेल्वेच्या नव्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती ५० हजार रुपयांमध्ये सात दिवसांसाठी एक कोच बुक करु शकतो. 

- तसेच, नऊ लाख रुपयांमध्ये १८ डब्यांची पूर्ण रेल्वे सात दिवसांसाठी बुक करता येणार आहे. 

- जर व्यक्ती किंवा संस्थेला १८  पेक्षा जास्त डबे हवे असतील तर प्रत्येक कोचसाठी ५० हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

- सात दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेन बुक करायची असल्यास पुढील प्रत्येक दिवसासाठी प्रती कोच १०हजार रुपये मोजावे लागतील.