हा आहे कलियुगातील "श्रावणबाळ" (व्हिडिओ)

आता २१ व्या शतकात जिथे अगदी फास्टफूड आणि इंटरनेटचा जमाना आहे तिथे आपल्याला या कलियुगातील श्रावणबाळ पाहायला मिळत आहे. ओडिसातील मयुरभंद जिल्ह्यातील मोरोदा गावात एक तरूण आपल्या आई-वडिलांना न्यायासाठी चक्क कावडीत घेऊन पायपीट करत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 1, 2017, 01:13 PM IST
 हा आहे कलियुगातील "श्रावणबाळ" (व्हिडिओ)  title=

ओडिसा : आता २१ व्या शतकात जिथे अगदी फास्टफूड आणि इंटरनेटचा जमाना आहे तिथे आपल्याला या कलियुगातील श्रावणबाळ पाहायला मिळत आहे. ओडिसातील मयुरभंद जिल्ह्यातील मोरोदा गावात एक तरूण आपल्या आई-वडिलांना न्यायासाठी चक्क कावडीत घेऊन पायपीट करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओडसातील या तरूणावर ‘श्रावण बाळ’ होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी कार्तिक सिंहचा आटापिटा सुरू आहे. 

आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते.

अखेर आई-वडिलांचे डोळे मिटवण्याआधी आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कार्तिक यांची न्यायमंदिरात पायपीट सुरु आहे. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे. पोलिसांमुळे अनेक निष्पाप व्यक्तींना खोट्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली.’ अशी माहिती वकिल प्रभूदाव मरांडे यांनी दिली आहे.