मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं

उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या मदरसा बोर्डानं याबाबतचे निर्देश दिलेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि तिरंगा रॅली काढण्याचे पत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आलंय. 

Updated: Aug 12, 2017, 11:40 PM IST
मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं title=

भोपाळ : उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या मदरसा बोर्डानं याबाबतचे निर्देश दिलेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि तिरंगा रॅली काढण्याचे पत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आलंय. 

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. राज्य सरकारनं मदरशांना याबाबत निर्देश दिल्याचं अल्पसंख्याक कल्याण मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी स्पष्ट केलंय. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य चळवळीतील शहिदांना श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. 

सरकारच्या निर्देशानंतर मदरशा शिक्षा परिषदेनं याबाबत पत्रक काढलंय. विशेष ध्वजारोहण कार्यक्रम करून त्याचं व्हिडिओ शूटिंगही करावं लागणार आहे. याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केलाय. मात्र ध्वजारोहण करून मदरशांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना येणार असेल, तर त्यात गैर काय असा सवाल चौधरी यांनी केलाय.