तीन तलाक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवेसीनी उपस्थित केला हा प्रश्न

 सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.  त्याचवेळी मुस्लीम महिलांनाच जर तलाक हवा असेल तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 22, 2017, 04:47 PM IST
तीन तलाक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवेसीनी उपस्थित केला हा प्रश्न title=

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.  त्याचवेळी मुस्लीम महिलांनाच जर तलाक हवा असेल तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

'ट्रिपल तलाक' मुस्लिम समाजातील महिलांसाठी अन्यायकारक असलेली ही प्रथा घटनाबाह्य ठरवत न्यायालयानं केंद्र सरकारला याबाबत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा होईपर्यंत ही प्रथा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी एक मोठं काम असेल.न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर इस्लाम आणि देशातील मुस्लिम महिलांचा विजय मानत यातून मुस्लिम महिलांवर होत असलेले अत्याचार थांबतील, अशी अपेक्षा असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली आहे.