के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  

PTI | Updated: Dec 13, 2018, 10:42 PM IST
के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान title=

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज भवनमध्ये झालेल्या मुख्यमंत्री पद सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.  

के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित केली. सहा महिन्यांपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, त्यांना हा निर्णय योग्य असल्याचे निवडणुकीत मिळेल्या निर्भळ यशातून स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुका घेतल्यास राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतील आणि त्यामुळे आपल्या पक्षाचे मोठे नुकसान होईल, असा त्यांचा होरा होता. त्यामुळे त्यांनी मुदतीपूर्वी निवडणुका घेतल्या आणि विजयाचे यश संपादन केले. 

तेलंगणामध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेत पुन्हा विराजमान झालेत. तेलंगणा राष्ट्र समितीच्या खात्यात राज्यातील एकूण मतांपैकी ४६.९ टक्के मते पडली. राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने ८८ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला २१ तर भाजपला कशीबशी १ जागा मिळाली.