उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचं दर्शन, सुरक्षेत कमालीची वाढ

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला हिंदी वर्तमान पत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली आहे. 

Updated: Nov 25, 2018, 08:56 AM IST
उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचं दर्शन, सुरक्षेत कमालीची वाढ  title=

अयोध्या : अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. त्याच बरोबर विहिंपकडून धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं आहे. कारसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येत असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला हिंदी वर्तमान पत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली आहे.

विहिंपची जय्यत तयारी 

रविवारी होणाऱ्या धर्मसभेसाठी विश्व हिंदू परिषदेचीही जय्यत तयारी सुरूय. या धर्मसभेसाठी ८० फूट लांब व्यासपीठ तयार आहे.

या व्यासपीठावर जवळपास दीडशेहून अधिक साधू, संत आणि महंत विराजमान होणारयत.

इथं येणाऱ्या रामभक्तांची संख्या दोन लाखांच्या आसपास असेल असा अंदाज विहिंपनं वर्तवलाय. त्यानुसार या धर्मसभा स्थळावर व्यवस्था करण्यात आलीय.