विजयादशमीच्या निमित्ताने गृहमंत्री भारत- पाक सीमेवर

शस्त्र पूजाही करणार....

Updated: Oct 14, 2018, 01:09 PM IST
विजयादशमीच्या निमित्ताने गृहमंत्री भारत- पाक सीमेवर  title=

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह विजयादशमी साजरा करण्यासाठी आणि शस्त्र  पूजा करण्यासाठी बीकानेर येथील भारत- पाक सीमेवर जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

भारत- पाकिस्तान सीमेनजीक, महत्त्वाच्या युद्धभूमी परिसरात होणाऱ्या या शस्त्र पूजेसाठी केंद्रीय मंत्रीमहोदयांची उपस्थितीची आणि त्यांच्या हस्ते पूजा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार 19 ऑक्टोबरला गृहमंत्री भारतीय सीमा रक्षक दलातील (बीएसएफमधील) जवानांसोबत हा सण साजरा करणार आहेत. याचवेळी शस्त्र पूजाही करण्यात येणार आहे. 

विजयादशमीच्या निमित्ताने आखण्यात आलेल्या दौऱ्यात सिंह सीमेनजीकच्या परिसराची परिस्थिती जाणून घेत तेथे आवश्यक असणाऱ्या सुविधांचीही पाहणी करणार आहेत.

दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते 'बडा खाना', (जवानांसोबतचं जेवण) या कार्यक्रमासाठी उपस्थितही राहणार असल्याचं कळत आहे. 

मागील वर्षी गृहमंत्र्यांनी सिनो- इंडियन सीमेनजीक असणाऱ्या जोशीमठ येथे विजयादशमी साजरा केली होती.